सार्वजनिक जलकुंभ व साठवण टाक्या स्वच्छ करण्याचे आदेश
सार्वजनिक जलकुंभ व साठवण टाक्या स्वच्छ करण्याचे आदेश
> जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशनचे सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पत्र अहवाल सादर करणे बंधनकारक
परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांच्या स्वच्छतेबाबत गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या तीव्र नाराजीनंतर आता दर महिन्याच्या 22 तारखेला सर्व सार्वजनिक जलकुंभ व साठवण टाक्या स्वच्छ करणे बंधनकारक करण्यात आले आहे असे आदेश १८ जून रोजी अंकुश चव्हाण यांनी पारित केला आहे २१ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे जल जीवन मिशन अंतर्गत मासिक DWSM बैठक पार पडली. या बैठकीत मा. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील गावागावांतील पिण्याच्या पाण्याच्या साठवण टाक्यांचा आढावा घेतला त्यावेळी अनेक ठिकाणी जलकुंभ व साठवण टाक्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने त्यात गाळ व शेवाळ साचल्याचे निदर्शनास आले. नाग रिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो या बाबीवर मा. जिल्हा धिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेची तातडीने दखल घेत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद परभणीचे प्रकल्प संचालक अंकुश चव्हाण यांनी सर्व पंचायत समितींच्या गट विकास अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत परभणी जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायती मध्ये दर महिन्याच्या 22 तारखेला सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ व साठवण टाक्या स्वच्छ कराव्यात संबंधित गट विकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवक यांच्यामार्फत गावांमधील सर्व टाक्या स्वच्छ करून घ्याव्यात व स्वच्छता केल्यानंतर कामाच्या फोटोसह कार्य अहवाल जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कार्यालयात सादर करावा तसेच दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 22 जून 2026 पासून या आदेशाची अंमलबजावणी झाली आहे.

