कन्नड “कन्नड येथील पांढरी मोहल्ल्यात रेड ” तीन किलो गांजा सह आरोपी अटकेत
कन्नड प्रतिनिधी: रायभान साळवे
कन्नड आज दिनांक 28/9/2026 रोजी कन्नड च्या उर्स मैदान जवळ असलेल्या पांढरी मोहल्ला परिसरात 3 किलो गांजा धाड टाकून हस्तगत करण्यात कन्नड शहर पोलिसांना यश आले.
आरोपी ना अटक करण्यास गेलेल्या पोलिसांना पाहून आरोपी ना मात्र पळ काढावा लागला तरी सुधा आरोपी पळ काढण्यास यशस्वी झाले नाही.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उर्स मैदान जवळ पांढरी मोहल्ल्यात दोन घरांमधे गांजा साठवण ठेवला आहे अशी माहिती मिळाली असता तेथे धाड टाकून त्या घरातील तीन महिला सह एक आरोपी ना ताब्यात घेतले.
आणि मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई करताना उर्स मैदान येथे छावनी चे स्वरूप आले असल्याने नागरिक पोलिसांचे कौतुक करत होते.
आरोपी मध्ये तीन महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे. त्यांच्या कडून 1,48,786.50/चा मुद्देमाल जप्त केला आहे
1) अल्ताफ अफजल रंगरेज, वय 20 वर्ष,
2) नसीम अफजल रंगरेज वय 55 वर्ष,
3) अफसाना शफी रंगरेज वय 35 वर्षे,
4)सानिया शकूर रंगरेज वय 19 वर्ष , सर्व राहणार पांढरी मोहल्ला कन्नड.
वरील सर्व आरोपींना दोन दिवसाचा pcr मंजूर झाला आहे.
5) शकूर रज्जाक रंगरेज हा आरोपी फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव अधिनियम 1985 चे कलम 8(C),20(B)( II),29 सह कलम 61,3(5) बी. एन. एस. नुसार गुन्हा दाखल.
वरील सर्व कारवाई डी .वाई एस. पी. अपराजिता अग्निहोत्री, यांच्या आदेशावरून प्रभारी पोलीस अधीक्षक आरती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सतीश दिंडे, पोलीस निरीक्षक महाजन,पोलीस हवालदार कैलास निंभोरकर, अशोक गायकवाड, संदीप घुगे, संदीप कनकुटे,आशा पाटील, निंभोरकर मॅडम, योगिता पाटील, सुकेशीनी कांबळे, शीतल बारगळ,आणि रेखा चव्हाण यांच्या पथका मध्ये सामील होते.
अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
