गोंदिया बालाघाट महामार्गावरील नागरा येथील घटना… घटनेनंतर स्थानिक नागरिकांचा महामार्गावर ठिय्या.
गोंदिया बालाघाट महामार्गावरील नागरा येथे भरधाव ट्रकने एका 35 वर्षीय तरुणाला चिरडल्याची घटना घडली आहे. लोकेश बघेले असे मृतक तरुणाचे नाव आहे… घटनेनंतर नागरा येथील नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मांडला आहे.. सध्या या महामार्गाचे बांधकाम सुरू असून बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व्यवस्था न केल्यामुळे यापूर्वी झालेल्या अपघातात 6 लोकांचा मृत्यू झाला आणि काल रात्री पुन्हा एका व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून बांधकाम करणाऱ्या कंपनीचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी यावे अन्यथा हा आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती मात्र पोलिसांच्या मध्यस्तीने रात्री उशिरा मृतदेह ताब्यात घेत स्व विच्छेदना करिता पाठविण्यात आले आहे
सरोज कावळे ब्युरो हेड गोंदिया
