स्लग . .वर्धा जिल्ह्यातील धोत्रा भागात अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर

0
download

अँकर . . वर्धा जिल्ह्यातील धोत्रा परिसरातील भागातील शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकाऱ्यांनी थेट जाऊन कोरड्या दुष्काळाची पाहणी केली. या परिसरात पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अधिकाऱ्यांनी पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.परिसरात कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन थेट शेताच्या बांधावर पोहोचले. कृषी सहाय्यक एस वाघमारे मॅडम ग्रामपंचायत अधिकारी रोशनी बाळबुधे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. पावसाअभावी करपून गेलेली पिके आणि संकटात सापडलेल्या बळीराजाची व्यथा प्रत्यक्ष जाणून घेतली. यावेळी पिकांचे फार मोठे नुकसान झाल्याचे त्यांना पहावयास मिळाले. या पाहणी दरम्यान मोठ्या संख्येने शेतकरी बांधव शेतशिवारात उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडल्या असून प्रशासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या शेतातील पिक पंचनामे सुरू झाले असून शेतकऱ्यांनी फार्मर आयडी, बँक पासबुक, आधार कार्ड या तिन्ही झेरॉक्स सोबत ठेवाव्यात, कारण पंचनामे करून पाच दिवसांत द्यायचे आहेत. त्याशिवाय शेतकऱ्यांनी शेतात पिकांची ई-पीक पाहणी करून नोंदणी करणे गरजेचे आहे, त्याकरिता शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रतिनिधी
सतीश काळे
वर्धा

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed