कन्नड ” गणेशपूर येथील जागृत गणपती मंदिर चोरी प्रकरणी दोन आरोपी गजाआड ” ‘पिशोर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ‘

0
download

कन्नड प्रतिनिधी: रायभान साळवे

या संदर्भात पिशोर पोलीस यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 29,सप्टेंबर ते 30,सप्टेंबर रात्री 11.00 ते 3 दरम्यान गणेशपूर येथील जागृत गणेश मूर्तीच्या डोक्यावरील चांदीचा मुकुट व गणपती समोरील चांदीचा मोदक चोरटय़ांनी चोरून घेतला होता, या प्रकरणी पिशोर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 305,331(4)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात चोरीचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी परिसरातील 30 ते 40 सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याचे फुटेज तपासून सलग चार दिवस तांत्रिक बाबी तपासून आरोपी हे शिर्डी येथील असल्याचे निष्पन्न झाले.
तपास पथकाने शिर्डी येथे जाऊन आरोपी
1 )भगवानसिंग दिलीप सिंग परदेशी राहणार शिर्डी
2) अनिल हिरालाल बेडवाल राहणार छ.संभाजीनगर या दोघांना दिनांक 7 ऑक्टोबर 26 रोजी अटक करण्यात यश मिळविले. त्यांच्या कडील चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदर गुन्ह्यातील 3 आरोपी असून उर्वरित 1 आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. प्रकाश जाधव, मा. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, सहायक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री, उपविभाग कन्नड यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शाम गवळी, पोलीस हवालदार दत्तात्रय मोरे, कैलास करवंदे, पोलीस नाईक फिरोज बर्डे, सुनील भिवसने,सायबर गुन्हे शाखेचे योगेश तरमाळे,s.d.p.o. कार्यालय शिर्डी येथील सहायक फौजदार इरफान शेख यांनी केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed