भरधाव ट्रॅकच्या धडकेत सार्वेच्या दोन तरुणांचा मृत्यू , संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको
पारोळा प्रतिनिधी
पारोळा तालुक्यातील नॅशनल हायवे क्रमांक ५३ वर असलेल्या सारवे गावाजवळ दोन तरुण रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक चालकाने जोरदार धडक देऊन त्यांचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक आठ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली, संतप्त ग्रामस्थांनी दिनांक ९ रोजी रास्ता रोको आंदोलन केले
दिनांक आठ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जय मधुकर पाटील (१७ ) आणि चंद्रकांत रविराज पाटील (१७,दोघे रा. सारवे तालुका पारोळा ) हे आपल्या शेतात गुर ढोरांना चारा पाणी करण्यासाठी गेले होते चारा पाणी टाकून पुन्हा घराकडे परत येत असताना गावाजवळच असलेल्या नॅशनल हवे क्रमांक ५३ वर रस्ता ओंडालत असताना पारोळा कडून जळगाव कडे भरधाव वेगाने येणारे ट्रक एम एच ३४ ए बी 1546 वरील चालक (चालक फरार) याने जय व चंद्रकात या दोन्ही तरुणांना जोरदार धडक दिली त्यात ते काही अंतरावर फेकले गेले असल्याने डोक्याला मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला गावातील नागरिकांनी तत्काळ त्यांना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले याप्रकरणी युवराज भावसिंग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरून ट्रक चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
नॅशनल हायवे क्रमांक 53 वर पारोळा पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेले सारवे ते बाबलेनाग फाट्यापर्यंतचे अंतर सध्या मृत्यूचे केंद्र बनलेले आहे या ठिकाणी होणाऱ्या सततच्या अपघातांमुळे मोठी जीवित हानी होत आहे नॅशनल हायवे प्रदीकरणाच्या चुकीच्या कामामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे परिसरात योग्य ठिकाणी गतिरोधक नाही दिशादर्शक फलक नाही सर्विस रोडाचे देखील व्यवस्थित नियोजन नसल्याने अपघातांना या ठिकाणी आमंत्रण व सामान्य माणसाचा संसार उघड्यावर येतो त्यामुळे आज परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येऊन सारे या ठिकाणी नॅशनल हायवे प्राधिकरण व संबंधित कंपनीच्या विरुद्ध रस्ता रोको आंदोलन केले
