अकोल्यात बचत गटांच्या कर्जवसुलीला स्थगिती देण्याची मागणी; शिवसेना (उबाठा) गटाचा आंदोलनाचा इशारा

0
download

अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल
अकोला: जिल्ह्यात बचत गटांच्या कर्जवसुलीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

दुष्काळ, पाणीटंचाई आणि रोजगाराअभावी आर्थिक संकटात सापडलेल्या महिला व शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी बचत गटांच्या कर्जाच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे.
यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाप्रमुख मुकेश मुरूमकर यांनी दिला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed