मानवतमध्ये शेतकऱ्याच्या पीक कर्जातील ६० हजार ऑनलाईन लंपास; मानवत पोलिसांनी फिर्याद घेण्यास दिला नकार!

0
download

परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

परभणी जिल्ह्यातील मानवत येथे मानवत तालुक्यातील एका शेतकऱ्याला ऑनलाईन फसवणुकीचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्याने शेतीसाठी काढलेल्या पीक कर्जातील ६० हजार रुपये अज्ञात भामट्यांनी परस्पर ऑनलाईन पळविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

 

 

 

 

काय आहे प्रकरण?
प्राप्त माहितीनुसार, मानवत येथील कोट गल्ली येथील शेतकरी विठ्ठल राजाभाऊ गोरे यांनी शेतीसाठी पीक कर्ज काढले होते. दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बँक खात्यातून चार टप्प्यात – १० हजार, २० हजार, २० हजार आणि १० हजार असे एकूण ६०,००० रुपये अज्ञात मोबाईल क्रमांकावरून (MOHDQASIM आणि MOIRSHA नावाने) ट्रान्स्फर करण्यात आले.

पैसे गायब झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने तात्काळ मानवत पोलीस स्टेशन गाठून फिर्याद देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मानवत पोलिसांनी त्याची लेखी फिर्याद घेऊन टाकली नाही. उलट, “तुम्ही सायबर कॅफेत जाऊन ऑनलाईन तक्रार दाखल करा” असे सांगून शेतकऱ्याला परत पाठवून दिल्याचा आरोप पीडित शेतकऱ्याने केला आहे.

अखेर नाईलाजाने शेतकऱ्याने सायबर क्राईम पोर्टलवर ऑनलाईन तक्रार (क्रमांक 21810260184075) दाखल केली आहे.

शेतकऱ्याचा सवाल – न्याय मागायचा कुणाकडे?
पीक कर्जाचे पैसे हातात पडण्याआधीच लुटले गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. एकीकडे बँकेचे कर्ज फेडायचे टेन्शन आणि दुसरीकडे पोलिसांकडून मिळत असलेली उदासीन वागणूक, यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याने न्याय मागायचा कुणाकडे? असा सवाल उपस्थित होत आहे.

या प्रकरणात मानवत पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून सायबर चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed