कन्नड “ऊसउत्पादकांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन “
कन्नड
“ऊसउत्पादकांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन ”
कन्नड प्रतिनिधी : रायभान साळवे
स्वाभिमानी शेतकरी संघटना तर्फे कन्नड पाणपोई फाटा येथील उड्डाण पुलावर बारामती एग्रो या कारखान्यात जाणार्या उसाच्या गाbड्या शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण होई पर्यंत काही दिवस बंद ठेवा यासाठी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलन दरम्यान गाड्या अडविण्यात आल्या.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सर्व ऊस उत्पादक शेतकरी आणि पदाधिकारी एकत्र आले आहेत .
आंदोलन कर्त्याच्या प्रमुख मागण्या.
1) महाराष्ट्रातील सर्व कारखान्यांनी या वर्षी प्रती टन 5000 रुपये भाव द्यावा.
2)ऊसतोड लवकर सुरू झाल्यामुळे उसाचे वजन कमी होत आहे त्याकरिता कारखान्याने 1000 रुपये अनुदान द्यावे.
3) लवकर ऊसतोडणी झाल्यामुळे कारखान्याची रिकवरी देखील कमी होणार आहे त्यासाठी कारखान्याला देखील प्रतिटन 500 रुपये अनुदान द्यावे.
4) केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर 50 रुपये इतका ठेवावा.
5)इथेनॉल चा दर 70 रुपये ठेवावा.
वरील सर्व मागण्या.उस उत्पादक शेतकरी यांच्या हिताच्या आहेत, शेतकरी जगला तरच कारखाना जगेल ही आमची ठाम भूमिका आहे.
या करिता आपणास विनंती आहे की या आंदोलनाला पाठिंबा म्हणुन आपण आपला कारखाना काही दिवस बंद ठेऊन आंदोलना ला पाठिंबा द्यावा, असे केल्यास शेतकर्यांच्या मागण्या शासन दरबारी मान्य होण्यास मदत होईल.
जर आपण सहकार्य केले नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना. शांततामय मार्गाने आपला कारखाना बंद करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन बारामती एग्रो या कारखान्याला देण्यात आले आहे,
निवेदनावर कृषीभुषण श्री. भाऊसाहेब थोरात, ( महाराष्ट्र प्रदेश सदस्य)श्री. दिनकर पवार, (मराठवाडा संघटक) श्री. कृष्णा साबळे, ( जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना छ.संभाजीनगर) श्री. प्रकाश बोरसे, ( तालुका अध्यक्ष.स्वाभिमानी शेतकरी संघटना कन्नड) श्री रामेश्वर भुसारे (पक्ष अध्यक्ष) यांच्या सह्या आहे.
