स्थानिक गुन्हे शाखा, अकोला ची पो.स्टे. जुने शहर हद्दीमध्ये जुगारावर कारवाई १३ आरोपीसह ४,०७,०३०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल
मा. पोलीस अधिक्षक अकोला श्री. अर्चित चांडक सा. यांनी अकोला जिल्हयातील अवैध जुगार चालविणा-या आरोपीतांविरुध्द कारवाई करणे करिता पो.नि. नितीन लेव्हरकर, स्था.गु.शा. अकोला यांना आदेशीत केले होते, त्याअनुषंगाने पो नि स्थागुशा यांनी अवैध जुगार संबंधाने रेड करणे कामी स्थागुशा येथील अधिकारी व अंमलदार यांचे पथक गठीत केले होते.
दिनांक १४/१०/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथील पथक जुगार रेड संबंधाने अकोला शहर विभागात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, चांदखाँ प्लॉट, अकोला येथील एका घरामध्ये काही इसम पैशांची हारजीत करून जुगार खेळत आहेत. सदर माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ व शिताफीने सदर ठिकाणी जुगार रेड कारवाई केली असता, १. अरबाज खान हुसेन खान, २. मोहम्मद राहील मोहम्मद अकील, ३. शेख करीम शेख इब्राहिम ऊर्फ कल्लू काटा, ४. शेख इमरान शेख इब्राहिम, ५. शेख जुबेर शेख इब्राहिम, ६. मोहसीन खान जहीर खान, ७. शेख शकील शेख जलील, ८. मोहम्मद नवेद अब्दुल हमीद, ९. इरशाद खान शकील खान, १०. सुमित सुखदेव कांबळे, ११. शेख सुमेर शेख लाला, १२. विजय सुरेश गलांडे, १३. अब्दुल रहमान अब्दुल हकीम सर्व राहणार अकोला हे जुगार खेळताना मिळून आले.
सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी व इतर साहित्य असा एकूण ₹४,०७,०३०/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये पोलीस स्टेशन जुने शहर, अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, ताब्यात घेतलेले आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईकरिता पोलीस स्टेशन जुने शहर, अकोला यांच्या ताब्यात देण्यात आले
