कपाशीवरील निष्क्रिय तणनाशक बाजारात!

0
WhatsApp Image 2026-07-27 at 10.28.20 AM

“धनलक्ष्मी कृषी केंद्रावरुन घेतलेले विलवूड चे औषध बोगस”

परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

सध्या कपाशीच्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढले आहे.त्यासाठी बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे तणनाशक उपलब्ध झाले असून विलवूड कंपनीचे बोगस तणनाशक सोनपेठ येथील कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांना विक्री केले जात आहे.सदरच्या तणनाशक चा कपाशीतील तन मारण्यासाठी कुठलाही उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लागून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या सोनपेठ तालुक्यातील रिमझिम पावसामुळे सर्वच पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तनाची जोमाने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी विविध पिकातील तणनाशकाच्या फवारणीचा वापर शेतकरी करत आहेत. त्यातच कपाशी पिकामधील तन मारण्यासाठी तणनाशकाच्या शोधात शेतकरी कृषी केंद्राकडे धाव घेत आहेत. यावेळी तालुक्यातील धार डिघोळ येथील बाबासाहेब गर्जे या शेतकऱ्यांनी आपल्या कपाशी पिकामधील तण नष्ट करण्यासाठी शहरातील श्री धनलक्ष्मी कृषी केंद्राकडे योग्य तन नाशकची विचरना केली. त्यावेळी संबंधित कृषी केंद्र चालकांकडून त्यांना विलवूड कंपनीचे दोन तन नाशक देण्यात आले. नाशकाचे फवारणीने कपाशी मधील सर्व प्रकारचे तन नष्ट होत असल्याची हानी कृषी केंद्र चालकाने दिली. त्या तणनाशकापैकी एक इंडोमिन्स आणि दुसरे विल हीट. हे दोन तन नाशक देण्यात आले. सदरील दोन्ही तणनाशक औषधं एकाच कंपनीचे असून, एक हेक्टर कपाशीवरील तणनाशक फवारणीसाठी ३००० रुपयांची औषधी घेतली.फवारणी करून वीस दिवसांचा कालावधी लोटला तरीही शेतीतील तन यत्कचितही मरत नसल्यामुळे शेतकऱ्याचे कपाशीचे पीक तणाचे विळख्यात सापडले. सदरच्या तणनाशक औषधीची फवारणी करुन एक टक्काही तण नष्ट झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीचा मोठा फटका बसला.तसेच तणनाशक फवारणी मुळे आज उद्या तण नष्ट होईल याची वाट पाहत शेतीतील तणाची मोठ्या प्रमाणात वाढ झाली.शेती पडीक सदृश्य झाली.परंतू सदरील बोगस तणनाशक औषधी विक्रेता व निर्माती कंपनीस कोणतेही सोयर सुतक नाही. अशा बोगस औषधी विक्रीतून तालुक्यातील अनेक वेळा असंख्य शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. सध्या सोनपेठ तालुक्यात बोगस औषधी व खतांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे याकडे संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अशाच प्रकारचे अनेक वेगवेगळ्या कंपनीचे बोगस औषध सध्या शहरातील विविध कृषी केंद्रावर उपलब्ध झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी संबंधित कृषी अधिकारी यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. या प्रकरणी संबंधित शेतकरी बाबासाहेब गर्जे यांनी संबंधित तननाशक निर्माती कंपनी आणि विक्रेता श्री धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र यांच्या विरोधात ग्राहक न्यायालयात लवकरच दाद मागणार असल्याचे सांगितले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed