भंडारा जिल्ह्यात सण – उत्सवाच्या पाश्वभूमीवर डिजे डॉल्बी सांऊड सिस्टम वर बंदी.
भंडारा – भंडारा जिल्ह्यात सण – उत्सवाच्या पाश्वभूमीवर डिजे डॉल्बी सांऊड सिस्टम वर बंदी.
भंडारा चाणक्य न्यूज
नरेंद्र शेंडे,


सण आणि उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी भंडारा जिल्ह्यात ‘ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंर्तगत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत
जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी श्री सावन कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार, हे निर्बंध दि. 4 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपासून ते 1 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 1:59 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहतील.
या अधिसूचनेतील कोणत्याही नियमांचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्ती अथवा मंडळावर प्रशासनातर्फे कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सर्व सण व उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हाहन करण्यात आले आहे.
