नांदेड | हदगाव स्लग : दगडवाडीत वर्षावासाला सुरुवात

0
download

हेडलाईन :
‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचे नियमित वाचन; आश्विन पौर्णिमेला होणार सांगता समारंभ

अँकर :
हदगाव तालुक्यातील दगडवाडी येथे आषाढी पौर्णिमेपासून वर्षावासानिमित्त ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे नियमित वाचन सुरू आहे. गावातील महिला मंडळाचा या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग असून, आश्विन पौर्णिमेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.

व्हॉइस ओव्हर :
हदगाव तालुक्यातील दगडवाडी या छोट्याशा गावात वर्षावासानिमित्त धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाला सुरुवात झाली आहे. वाचक दत्ता लोणे आणि सुभाष कांबळे यांच्याकडून दररोज ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन केले जात आहे.

दररोज सायंकाळी आठ वाजता ग्रामस्थ बुद्धविहारात एकत्र येतात. बुद्धवंदनेनंतर ग्रंथाचे वाचन आणि श्रवण केले जाते. विशेष म्हणजे, दिवसभर मजुरीचे काम करूनही गावातील महिला मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होत आहेत. महिला मंडळाच्या एकजुटीमुळे या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

वर्षावासाच्या काळात धम्माचे आचरण, वाचन आणि उपासना यावर भर दिला जात असून, या उपक्रमातून इतर गावांनाही प्रेरणा मिळत आहे.

आषाढी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या वर्षावासाची सांगता आगामी आश्विन पौर्णिमेला होणार आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वाचक दत्ता लोणे आणि सुभाष कांबळे यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed