ब्रेकिंग न्यूज | बोरगाव मंजूजवळ तेलाच्या ट्रकला भीषण आग! अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़

0
download

बोरगाव मंजू (अकोला): महामार्ग क्रमांक ५३ वर एक धक्कादायक घटना घडली आहे. चालत्या तेलाच्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आगीने काही क्षणातच ट्रकला आपल्या विळख्यात घेतले. आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत होत्या.
ट्रक चालकाचा अद्याप शोध नाही!
या घटनेनंतर ट्रक चालकाबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. काहींच्या मते चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे, तर दुसरीकडे चालक ट्रकमध्येच अडकल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे नेमकं सत्य काय, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
चालकाबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed