मतदार यादीतील कथित घोळावर युवक काँग्रेस आक्रमक! ‘वोट चोरी’च्या आरोपांच्या चौकशीची मागणी

0
download

ANCHOR :- महाराष्ट्रातील मतदार यादीच्या पुनरीक्षणावरून गोंदिया जिल्हा युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. मतदारांच्या नावांमध्ये झालेले बदल, कथित बनावट मतदार आणि ‘वोट चोरी’च्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी युवक काँग्रेसने पत्रकार परिषदेत केली.

:- गोंदियात झालेल्या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव रमीज शेख आणि महाराष्ट्र प्रदेश NSUIचे माजी प्रदेश उपाध्यक्ष संदीप रहांगडाले उपस्थित होते. यावेळी युवक काँग्रेसने मतदार यादीशी संबंधित उपलब्ध माहिती माध्यमांसमोर मांडली. मतदारांच्या नावांमध्ये झालेले बदल, कथित अनियमितता आणि बनावट मतदारांच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच SIR प्रक्रियेदरम्यान ज्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत, अशा पात्र मतदारांची नावे पुन्हा यादीत समाविष्ट करावीत, अशी मागणी युवक काँग्रेसने केली. ‘वोट चोरी’च्या आरोपांची चौकशी करून पारदर्शक आणि निष्पक्ष मतदार यादी तयार करावी, अशी भूमिका युवक काँग्रेसने मांडली. यासोबतच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली.

BYTE -:- रमीज शेख ( महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव )

-:- दरम्यान, मतदार यादीतील कथित घोळ, SIR प्रक्रियेत वगळण्यात आलेली नावे आणि ‘वोट चोरी’च्या आरोपांवरून युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून पात्र मतदारांची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करावीत, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे. आता निवडणूक आयोग या आरोपांवर आणि मागण्यांवर काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरोज कावळे ब्युरो हेड गोंदिया

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed