SIR आणि Form-6 वर आमदार विनोद अग्रवाल यांचे स्पष्टीकरण; म्हणाले—राजकीय आरोप नव्हे, तथ्यांवर चर्चा करा
SIR अर्थात मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी निवडणूक आयोगाची भूमिका आणि Form-6 संदर्भात आपली भूमिका मांडली आहे. राजकीय आरोप करण्यापेक्षा या विषयावर तथ्यांच्या आधारे चर्चा व्हावी, असे आवाहन त्यांनी केले.
:- पत्रकार परिषदेत बोलताना आमदार विनोद अग्रवाल यांनी SIR प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाकडून स्पष्ट माहिती देण्यात आल्याचे सांगितले. तसेच Form-6 चा वापर नव्या पात्र मतदारांच्या नोंदणीसाठी केला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी अग्रवाल यांनी 27 मे 2026 रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लेख करत बिहारमधील SIR प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाच्या अधिकारांवरही भाष्य केले.
एकूणच, SIR आणि Form-6 च्या मुद्द्यावर आमदार विनोद अग्रवाल यांनी राजकीय आरोपांऐवजी तथ्यांच्या आधारे चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागले आहे.
सरोज कावळे ब्युरो हेड गोंदिया
