स्लग . . व्होट चोरी विरोधात काँग्रेसचे जोरदार आंदोलन; प्रशासनाला निवेदन

0
download

अँकर . . व्होट चोरीच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्यावतीने आज वर्धा येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशात लोकशाही धोक्यात असून मतदार याद्यांमध्ये घोळ घालून व्होट चोरी केली जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी आंदोलकांनी केला. केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी बोलताना काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, मतांचा अधिकार हा संविधानाने दिलेला सर्वात मोठा अधिकार आहे. त्यात छेडछाड होत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही. निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनानंतर प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन शांततेत पार पडले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed