मगर सावंगी येथे शिवसेना उ. बा. ठा. गटाच्या वतीने शासनाच्या कथित फसव्या जीआरची होळी

0
download

शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्याचा आरोप; जीआरच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा आक्रोश”

महाराष्ट्र, परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

मानवत तालुक्यातील मगर सावंगी येथे २८ सप्टेंबर रोजी शिवसेना उ. बा. ठा. गटाच्या वतीने शासनाने शेतकऱ्यांसाठी काढलेल्या जीआरची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. शासनाने शेतकऱ्यांसाठी काढलेला जीआर हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा असून हा फसवा जीआर असल्याचा आरोप यावेळी शिवसेना उ. बा. ठा. गटाचे उपतालुका प्रमुख गणेशराव मगर यांनी केला.
यावेळी गणेशराव मगर यांनी शासनाच्या जीआरचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत जीआरची होळी केली. भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी जो जीआर काढला आहे, तो शेतकऱ्यांच्या हिताचा नसून केवळ दिखावा आहे, असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या वास्तविक प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याऐवजी केवळ घोषणा करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या फसव्या जीआरचा निषेध म्हणून शेतकरी व शिवसेना उ. बा. ठा. गटाच्या वतीने जीआरची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाच्या शेतकरीविरोधी भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी शिवसेना उ. बा. ठा. गटाचे उपतालुका प्रमुख गणेशराव मगर यांच्या सह गावातील शेतकरी रावण आप्पा मगर, नामदेवराव मगर, मुंजाभाऊ मगर, विलासराव मगर, राजेभाऊ मगर, गोरख मगर, बाबासाहेब मगर, विठ्ठलराव मुटकुळे, सुभाष मगर, नारायण मगर, मगनाथ मगर, महादेव मगर, सिद्धेश्वर मगर, भगवानराव मगर, बापू मगर, प्रभाकर मगर, रामभाऊ मगर, बालासाहेब मगर, बबन मगर आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून त्यांच्या मागण्यांवर तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांकडून करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed