युवाशक्तीचा जल्लोष! तळणी फाटा–ठेंगे वडगाव मार्गावर भव्य मॅरेथॉन स्पर्धा
तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांच्या हस्ते मॅरेथॉनचा शानदार शुभारंभ
मंठा : जगदीश राठोड
अंतरीक्ष करिअर अकॅडमीच्या वतीने बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तळणी फाटा ते ठेंगे वडगाव या मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा शुभारंभ शिवसेना तालुकाप्रमुख तथा नगरसेवक उदयसिंह बोराडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख प्रमुख उपस्थित होते. मॅरेथॉनमध्ये युवक-युवतींसह क्रीडाप्रेमींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
युवकांमध्ये क्रीडा व व्यायामाची आवड निर्माण व्हावी, शारीरिक तंदुरुस्तीबाबत जनजागृती व्हावी, तसेच निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. तळणी फाटा येथून सुरू झालेली मॅरेथॉन ठेंगे वडगाव येथे उत्साहात संपन्न झाली.
या स्पर्धेचे आयोजन अंतरीक्ष करिअर अकॅडमीचे संचालक राजेश शिंदे सर यांच्या वतीने करण्यात आले. स्पर्धेदरम्यान युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक केंद्र, भगवानराव गायकवाड, गोविंद साळुंके, पोलीस कर्मचारी ढवळे साहेब, काकडे साहेब, मदने साहेब, पप्पू बोराडे, डिगा बोराडे, रितेश खरात यांच्यासह अंतरीक्ष करिअर अकॅडमीचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व मान्यवर उपस्थित होते.
