वर्धा स्लग : मशाल पेटवू, घरोघरी सुपोषण आणू दारी

0
download

सुपोषित बालक, सुदृढ भारत’साठी मशाल रॅली; घरोघरी सुपोषणाचा जागर*

अँकर . . वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे बालकांचे कुपोषण दूर करून सुदृढ आणि समृद्ध भारत घडविण्यासाठी ‘मशाल पेटवू, घरोघरी सुपोषण आणू दारी’ या विशेष जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. गावोगावी महिला व बालकांच्या सहभागातून ही मशाल रॅली काढण्यात आली
पोषण प्रत्येकाचा हक्क, संतुलित आहार-सुदृढ आयुष्य, आरोग्यदायी आई-सुदृढ बाळ, पोषण म्हणजे प्रगती, चला सुपोषणाकडे एक पाऊल अशा घोषणांचे फलक हाती घेऊन अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गटाच्या महिला व शालेय विद्यार्थिनी घरोघरी जाऊन सुपोषणाचा संदेश देणार आहेत.
या अभियानाचा मुख्य उद्देश गर्भवती व स्तनदा मातांचे आरोग्य सुदृढ करणे, बालकांची योग्य वाढ व विकास साधणे, कुटुंबात संतुलित आहाराची सवय लावणे आणि सशक्त समाज निर्माण करणे हा आहे.
‘सुदृढ मुलं, सुदृढ गाव, समृद्ध भारत’ आणि ‘सुपोषण हेच खरे समृद्धीचे दर्शन’ हा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी सर्व नागरिकांनी या मशाल रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
या रॅलीमध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिक व अंगणवाडी सेविका मदसनी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता . माजी सरपंच नीतीन चंदनखेडे माजी ग्रा . प . सदस्य सतीश काळे उज्वला बोरकर सर्व अंगनवाडी सेवीका मदतीसनी या कार्यक्रमाला उपस्थित होते
प्रतिनिधी
सतीश काळे
वर्धा

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed