कन्नड “गणपती मंदिरात चोरी” गुन्हा दाखल ” पिशोर च्या गणेशपूर येथील घटना कन्नड प्रतिनिधी : रायभान साळवे

0
download

या संदर्भात पोलीस ठाणे पिशोर यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की,
दिनांक 29/9/2026 च्या रात्री अकरा वाजता ते दिनांक 30/9/2026 च्या पहाटे 3 वाजेच्या दरम्यान एका अज्ञात आरोपी ने गणेशपूर येथील गणपती मंदिराचा दरवाजा चे कुलुप तोडून मंदिराच्या आत प्रवेश केला .
मंदिरातील गणपतीच्या मूर्ती च्या डोक्यावर असलेली चांदीचा मुकुट वजन अंदाजे 2 किलो 250 ग्रॅम चा गोलाकार चांदीचा मुकुट ज्याची बाजार भावा प्रमाणे किंमत 2,00,000 रुपये आहे किंबहुना असू शकते, आणि 250 ग्रॅम वजनाचे चांदीचा मोदक आकाराचा मुकुट, ज्याची किंमत अंदाजे 20,000 रुपये असा एकूण 2,20,000 हजार रुपये चा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
या संबंधी फिर्यादी जुलालसिंग सूरसिंग राजपूत रहाणार गणेशपूर तालुका कन्नड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे पिशोर येथे बी.एन.एस. नुसार कलम 305,331,(4) असा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री कुणाल सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार पोलीस नाईक/332 श्री बरडे हे करीत असून घटनास्थळी असलेल्या cctv फुटेज तसेच इतर मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed