वर्धा स्लग . . वाघच नाही तर जैवविविधतेचा खजिना पाहा… बोर व्याघ्र प्रकल्पात सफारीला सुरुवात, वनअधिकाऱ्याचे पर्यटकांना आवाहन*
अँकर . . वर्धा बोर व्याघ्र प्रकल्पातील सफारीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पत्रकारांसाठी विशेष सफारीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोरचे सहाय्यक वनसंरक्षक आशिष उज्वलराव देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, बऱ्याचदा पर्यटक फक्त वाघ, अस्वल किंवा हरीण यांसारखे मोठे वन्यजीव पाहण्यासाठी येतात. मात्र जंगलात आल्यानंतर एक वेगळी अनुभूती मिळते. इथे वेगवेगळे कोळी, कीटक, मशरूम, विविध रंगांचे गवत, फुलपाखरं पाहायला मिळतात. हीच खरी जैवविविधता आहे.
बोरमध्ये पाण्याचे तळे, जलस्रोत, डोंगर तसेच गवताळ मैदाने आहेत. गवताळ मैदानातही वेगळी जैवविविधता असून अनेक प्राणी तिथे वास्तव्य करतात, असेही त्यांनी सांगितले.
पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळावा, हा वनविभागाचा उद्देश आहे. जिप्सी चालक, गाईड, तसेच रिसॉर्ट आणि होम स्टे मधून स्थानिक युवकांना रोजगाराची संधी मिळते. यातून वर्धा जिल्ह्यातील परिसराचा विकास साधता येईल, असे आवाहन देशमुख यांनी केले.
वर्ध्यात आलात तर बोर व्याघ्र प्रकल्पाला नक्की भेट द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
वेळी वर्धा येथील माहिती जिल्हा अधिकारी मंगेश वरकड व पत्रका बांधव यांची उपस्थिती होती .
बाईट . . आशिष देशमुख
वन अधिकारी वर्धा
प्रतिनिधी
सतीश काळे
वर्धा
