शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बळीराजा संघ आक्रमक गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागण

0
download

:- गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन बळीराजा शेतकरी संघाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकर्यांन मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना निवेदन देण्यात आले आहे तर गोंदिया भंडारा जिल्यातील खासदार आणि आमदार यांची देखील बळीराजा शेतकरी संघ भेट घेत त्यांना देखील आपल्या मागण्यांचे निवेदन देणार आहे तर ज्या आमदारांनी खासदारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न येत्या अधिवेशनात मांडले नाही तर बळीराजा शेतकरी संघ त्यांच्या निषेध नोंदवत त्यांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघाचे अध्यक्ष संजय टेंभरे आणि शेतकऱ्यांनी दिला आहे
:- गोंदिया तालुका हा मोठ्या प्रमाणात चारही दिसांनी जंगलाला लागून असल्याने जंगलातील हिंसक वन्यप्राणी तसेच जंगली रानडुकरे मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे नुकशान करतात मात्र वन विनविभागाकडून शेतकऱ्याना योग्य मोबदला दिला जात नाही तर दुसरीकडे वन अधिकारी जंगला शेजारी असलेल्या शेतकऱ्यांना वन कायद्याची भीती दाखवतात त्यामुळे शेतकर्याना प्रति एकर २५ हजार रुपये नुकसानभरपाई देऊन ती १५ दिवसांत DBTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सोबतच वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सौर कुंपण किंवा तार कुंपण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने नुकतीच दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील फक्त तिरोडा तालुक्याचा समावेश करण्यात आला असून जिल्ह्यातील इतर तालुके या यादीतून वगळण्यात आल्याने संपूर्ण गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघाने निवेदन देत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे तसेच मागील वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली असली तरी अद्याप धान बोनस जाहीर करण्यात आलेला नाही, असा मुद्दाही संघाने उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचा बोनस तातडीने देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.यासोबतच प्रधानमंत्री पीक विमा योजनेत वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान समाविष्ट करावे, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी अथवा मृत झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, नुकसानभरपाईच्या प्रक्रियेतील जाचक अटी शिथिल कराव्यात, तसेच वन विभागाच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा विविध मागण्या निवेदनातून ठेवण्यात आल्या आहेत.
BYTE -:- संजय टेंभरे जिल्हा परिषद सदस्य
BYTE -:- शेतकरी

:- तर नागपुरात होणाऱ्या अधिवेशात गोंदिया भंडारा जिल्यातील खासदार तसेच आमदारांनी शेतकऱ्यांनी आमच्या मागण्या सरकापुढे ठेवून सोडवून देण्यास मदत केली नाही तर अधिवेशनात गोंदिया भंडारा जिल्यातील शेतकरी भव्य मोर्चा काढून आमदारान शह सरकारचा देखील निषेध करतील असा इशारा बळीराजा शेतकरी संघाने दिला आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोंदिया जिल्यातील शेतकऱ्यांची दखल घेतात काय हे पाहण्यासारखे असेल

सरोज कावळे ब्युरो हेड गोंदिया

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed