ऑपरेशन प्रहार अंतर्गत……. स्थानिक गुन्हे शाखा, अकोलाची धडाकेबाज कारवाई..! गावठी कट्टा, जिवंत काडतुसे व धारदार चाकूसह ३ आरोपी जेरबंद….!
अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़
स्थानिक गुन्हे शाखा, अकोलाच्या पथकाने एका गंभीर गुन्हयाचा कट उधळून लावत मोठी कारवाई केली आहे. लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगणा-या तीन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून देशी कट्टा, जिवंत काडतुसे, धारदार चाकू, मोबाईल असा एकूण ४९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंदयाविरूध्द ऑपरेशन प्रहार ही मोहीम राबविण्यात येते
