सकल गोर बंजारा समाजाच्या वतीने महामोर्चा व रास्ता रोको आंदोलन अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ बार्शीटाकळी (जि. अकोला) येथे सकल गोर बंजारा समाजाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी भव्य महामोर्चा व रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक: गुरुवार, दि. १ ऑक्टोबर २०२६
वेळ: सकाळी ११:०० वाजता
स्थळ: कासमनाना चौक, बार्शीटाकळी, जि. अकोला
प्रमुख मागण्याः
बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गाच्या धर्तीवर आरक्षण देण्यात यावे.
बंजारा समाजाला ST आरक्षण लागू होईपर्यंत ST प्रवर्गाच्या सर्व सोयी-सुविधा लागू करण्यात याव्यात.
या आंदोलनात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले
