ब्राम्हणवाडा थडी पोलीसांची मोठी कारवाई गावढी दारू भट्टी उद्ध्वस्त. सविस्तर माहिती अशी की अमरावती जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी पोलिसांची महाराष्ट्र व मध्यप्रदेश सिमेलगत असलेल्या मध्य प्रदेश येथील येणखेडी दाबोना गावात हातभट्टीची दारूची मोठ्या प्रमाणात निर्मिती व विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळताच ब्राह्मणवाडा थडी पोलीसांनी माहितीच्या आधारे विशेष मोहीम राबवून,

0
download

आज दिनांक 01/10/2026 रोजी पो स्टे ब्राह्मणवाडा थडी हद्दीलगत 15 कि. मी. वर असलेल्या (मध्य प्रदेश )येथील येनखेडी. दाभोना या गावातील शेत शिवारामधील नाल्यांमध्ये अवैध गावठी हातभट्टी दारू तयार होत असल्या बाबत गोपनीय माहिती मिळाल्यावर मध्य प्रदेश पोलिस स्टेशन आठनेर हद्दीतील ग्राम दाभोणा , ऐनखेडी. शेत शिवारातील नाल्यांकाठील जंगलामध्ये पोलिस स्टेशन ब्राह्मणवाडा थडी येथील ठाणेदार प्रशांत जाधव साहेब, सोबत पोलीस हवालदार अमोल राऊत ,हेमंत येरखडे, राजू मरसकोल्हे अश्या स्टाफचे विशेष पथक सह शोध घेतला असता अवैध दारू काढण्याचे ठिकाणवर छापा मारून सुमारे 08 ड्रम (08×200=1600लिटर ) मोहा फुल सडवा किंमत 1,60,000 रु व 8000रु चे इतर साहित्य असा एकूण 1,68,000(एक लक्ष अडूसष्ट हजार रु) चा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. सदर छापा कारवाईबाबत पोलीस ठाणे आठनेर येथे माहिती देण्यात आली आहे.ते पुढील कार्यवाहीआठणेर पोलीस करत आहेत. अमरावती जिल्हा प्रतिनिधी -कैलास वाकपांजर

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed