बहुजन भीम सेनेच्या विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची निवड नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन; ‘जयभीम, जय संविधान’चा संदेश कन्नड प्रतिनिधी – रायभान साळवे
कन्नड, छ. संभाजीनगर : बहुजन भीम सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी गोरख दिवेकर यांची निवड करण्यात आली असून, तसेच विविध तालुका व जिल्हास्तरीय जबाबदाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेच्या उपलब्ध माहितीनुसार, संजय भाऊ यांची तालुकाध्यक्षपदी, अविनाश वाघ यांची जिल्हाध्यक्षपदी तसेच भगवान बळे यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे सुनिता ताई यांची राष्ट्रीय मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर संघटनेची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविणे, सामाजिक प्रश्नांवर संघटितपणे काम करणे तसेच संविधानिक मूल्ये आणि सामाजिक न्यायाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी राहणार आहे.
पदनिवडीची घोषणा झाल्यानंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे विविध कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांकडून अभिनंदन करण्यात आले. आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या विविध विषयांवर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
