काल दिनांक २ ऑक्टोबर २०१६ रोजी “गांधी जयंती” निमित्ताने गडचिरोली ट्राइबल डॉक्टर्स असोसिएशन (GTDA) ने अतिशय दुर्गम अशा मौजा आसावंडी तह एटापल्ली जिल्हा गडचिरोली येथे भव्य मोफत अतिविशेषोपचार रोगनिदान आणि औषध वितरण शिबिराचे आयोजन केले होते…

0

शिबिरामध्ये जवळपासच्या गावातील रुग्णांनी येऊन आपले आरोग्याची तपासणी करून घेतले..
शिबिरात ३५० रूग्णांची नोंद करण्यात आली…
विशेष म्हणजे गोंडी भाषेत डॉ आशिष मनोहरराव कोरेटी यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेल्या संपूर्ण जनतेला आणि रुग्णांना आपत्कालीन परिस्थित हार्ट अटॅक किंवा कुठल्याही परिस्थित रुग्णाचा श्वासोच्छ्वश्वास थांबला असल्यास रुग्णाला सीपीआर (CPR) किंवा कार्डियाक मसाज देऊन रुग्णाचा जिव कशाप्रकारे वाचवू शकतो याचे प्रात्यक्षिक पुतळ्यावर करून दाखवले

शिबिरामध्ये आरोग्यसेवा देण्याकरिता खालील वैद्यकीय चमू उपस्थित होते –

१) डॉ सुनील भाऊ मडावी (अध्यक्ष GTDA)
२) डॉ मिताली आत्राम मॅडम (महिला अध्यक्ष GTDA)
३) डॉ प्रियांका मडावी मॅडम (स्त्रीरोग तज्ञ)
४) डॉ चेतन भाऊ कोवे (दंतरोग तज्ञ)
५) डॉ मनोहर भाऊ मडावी
६) डॉ नितीन भाऊ मसराम
७) डॉ बासू भाऊ नरोटे
८) डॉ अनिल भाऊ गेडाम (बालरोग तज्ञ)
९) डॉ तारकेश्वर भाऊ उईके (बालरोग तज्ञ)
१०) डॉ सचिन भाऊ मडावी (समाज कल्याण उपायुक्त)
११) डॉ आशिष म. कोरेटी
१२) डॉ उमेश भाऊ शिडाम
१३) डॉ श्रीकांत सोयाम
१४) डॉ चौधरी सर (तालुका आरोग्य अधिकारी)
१५) डॉ देव सर (अस्थिरोग तज्ञ ,GMC Gad.)
१६) डॉ रामटेके सर (अस्थिरोग तज्ञ, GMC Gad)

आणि संपूर्ण CHO, फार्मासिस्ट टीम, स्टाफ नर्स आणि आशा वर्कर तसेच आसावंडी गावातील संदीपभाऊ पोटावी आणि त्यांच्या संपूर्ण चमूनी मेहनत घेतली आणि शिबिर यशस्वी केले…
——————-–—-
गडचिरोली सबादाता आशिफ़ कुरेशी

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed