शिंगणापूर फाट्यावर ६ ऑक्टोबरला बेमुदत रस्ता रोको ; स्वाभिमानीचा इशारा

0
WhatsApp Image 2026-10-04 at 1.45.47 PM

“ऊसाला उर्वरित ३०० रुपये मिळविण्यासाठी तालुक्यातील ईटाळी, केकरजवळा, उक्कलगावात बैठका”

 

परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

गेल्या हंगामात गाळप झालेल्या ऊसाला कारखान्यांनी जाहीर केलेल्या २५०० रुपयांव्यति रिक्त उर्वरित ३०० रुपये मिळविण्या साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या मागणी साठी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी शिंगणापूर फाटा येथे बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे मराठवाडा अध्यक्ष किशोर भाऊ ढगे यांनी दिली. या आंदोलनाच्या नियोजनासाठी शुक्रवार ३ ऑक्टोबर रोजी मानवत तालुक्यातील मौ. केकरजवळा, ईटाळी आणि उक्कलगाव येथे गावनिहाय नियोजन बैठका घेण्यात आल्या. यावेळी मार्गदर्शन करताना किशोर भाऊ ढगे म्हणाले की, लक्ष्मी – नृसिंह गंगाखेड जी – ७ शुगर व श्री तुळजाभवानी या तिन्ही कारखान्यांनी गेल्या वर्षी २५०० रुपये भाव दिला आहे. प्रत्यक्षात कारखान्यांना २८०० रुपये देणे बंधनकारक असताना शेतकऱ्यांना ३०० रुपयांपासून वंचित ठेवले जात आहे. हा पैसा मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. या बैठकीस शेतकरी कामगार पक्षाचे रामराजे महाडिक, विठ्ठल चौकट, रंजीत चव्हाण, नामदेव काळे यांच्या सह तिन्ही गावातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंगणापूर फाट्या वरील आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed