वर्धा स्लग . . सावध नागरिक, सुरक्षित समाज : वर्धा पोलिसांचे सायबर जनजागृती आवाहन

0
download

अँकर . . डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र याच माध्यमांचा वापर करून सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन मार्ग अवलंबत आहेत. या पार्श्वभूमीवर वर्धा पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे नागरिकांना मार्गदर्शन केले. डिजिटल अरेस्ट, बनावट गुंतवणूक, पार्ट टाईम जॉब, टास्क फ्रॉड, OTP तसेच KYC अपडेटच्या नावाने होणाऱ्या फसवणुकीपासून प्रत्येकाने सावध राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पिन, पासवर्ड किंवा बँकेशी संबंधित गुप्त माहिती कोणालाही देऊ नका अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, तसेच अनोळखी फाईल डाऊनलोड करू नका.
कोणत्याही आमिषाला बळी पडू नका.
सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर संपर्क साधा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिनिधी
सतीश काळे
वर्धा

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed