नांदेड | हदगाव | अतुल राऊतराव स्लग : सुभाष शुगर व शिऊर कारखान्यांचा अंतिम ऊसदर ३२०१ रुपये

0
download

नांदेड | हदगाव | अतुल राऊतराव

स्लग :

सुभाष शुगर व शिऊर कारखान्यांचा अंतिम ऊसदर ३२०१ रुपये

 

ऊस उत्पादकांना दिलासा; फेब्रुवारीअखेरपर्यंत मिळणार ३४०१ रुपयांपर्यंत दर

अँकर :

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. श्री सुभाष शुगर आणि शिऊर साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामासाठी ३२०१ रुपये प्रतिमेट्रिक टन अंतिम ऊसदर जाहीर केला आहे. प्रोत्साहन योजनेनुसार हा दर टप्प्याटप्प्याने वाढणार असून, फेब्रुवारीअखेरपर्यंत शेतकऱ्यांना ३४०१ रुपये प्रतिमेट्रिक टन दर मिळणार आहे.

व्हॉइस ओव्हर :

जाहीर केलेल्या दरानुसार ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ३२०१ रुपये, १ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान ३३०१ रुपये, तर १ ते २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत ३४०१ रुपये प्रतिमेट्रिक टन दर मिळणार आहे.

कमी पर्जन्यमानामुळे यंदा अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत कारखाना प्रशासनाने हा दर जाहीर केला आहे.

श्री सुभाष शुगर कारखान्याचे चेअरमन सुभाषराव लालासाहेब देशमुख आणि कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गाळप हंगामाचे नियोजन करण्यात येत आहे.

कळमनुरी, हदगाव, हिमायतनगर, उमरखेड आणि परिसरातील शेतकरी या दोन्ही कारखान्यांना ऊस पुरवठा करतात. दोन्ही कारखान्यांची एकत्रित गाळप क्षमता दररोज सुमारे ११ हजार मेट्रिक टन आहे.

दरासोबतच आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांना निरोगी व दर्जेदार ऊस रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या रोपांच्या वाहतुकीचा खर्चही कारखाना प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

ऊसदरातील वाढ, प्रोत्साहन योजना आणि दर्जेदार रोपांच्या उपलब्धतेमुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed