नांदेड/ हदगाव अतुल राऊतराव दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी आरोग्य शिबिराचा आधार पाच हजारांहून अधिक शेतकरी कुटुंबीयांची आरोग्य शिबिराला उपस्थिती दुष्काळाच्या झळांमध्ये आरोग्याची काळजी; मोफत आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद
अँकर:-दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या आरोग्यासाठी आता मदतीचा हात पुढे आला आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळत असून, दुपारी साडेबारा वाजेपर्यंत तब्बल पाच हजारांहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला आहे. तर सायकाळ पर्यंत 10 हजाराहून अधिक रुग्ण सहभाग घेतील असा विश्वास आमदार कोहळीकर यांनी व्यक्त केलाय,
विशेष म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील शंभरहून अधिक जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळाही आयोजित करण्यात येणार आहे..
बाईट:-आमदार बाबुराव कदम कोहळीकर
