शॉर्टसर्किटने पाच एकर ऊस जळून खाक “महावितरणच्या दुर्लक्षाचा शेतकऱ्याला फटका; दहा लाखांचे नुकसान” परभणी/प्रतिनिधी रमेश मुलगीर

0
download

सोनपेठ तालुक्यातील शिर्शी बु. येथील शेतकरी पांडुरंग सोळंके यांच्या गट क्रमांक ६२ मधील पाच एकर ऊस पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून संपूर्ण ऊस जळून खाक झाला. या घटनेत अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
शेतातून जाणाऱ्या वीजवाहिनीमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने तिची दुरुस्ती करण्याची मागणी महावितरणकडे अनेकदा करण्यात आली होती. मात्र, संबंधित यंत्रणेने या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, असा आरोप शेतकरी पांडुरंग सोळंके यांनी केला आहे.
वीजवाहिनीमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन ऊसाच्या शेतात आग लागली. ऊसाचे पीक उभे असल्याने आगीने काही क्षणांतच मोठे स्वरूप धारण केले. पाहता पाहता पाच एकरांवरील ऊस जळून खाक झाला. ऐन उत्पादनाच्या काळात पीक हातचे गेल्याने सोळंके यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

नुकसानभरपाईची मागणी

वारंवार बिघाड होणाऱ्या वीजवाहिनीची वेळीच दुरुस्ती झाली असती, तर ही दुर्घटना टाळता आली असती, असा संताप शेतकरी व ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. महावितरणने घटनेची तातडीने चौकशी करून शेतकऱ्याला योग्य नुकसानभरपाई द्यावी, तसेच धोकादायक वीजवाहिनीची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed