हदगाव / नांदेड अतुल राऊतराव स्लग :- पळसा सज्जात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात संपन्न नागरिकांच्या विविध कामांना मिळाला प्रतिसाद;शिबिरामुळे समाधानाचे वातावरण
हदगाव तहसील कार्यालयांतर्गत मंडळ बरडशेवाळा येथील पळसा सज्जामध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात संपन्न झाले. या अभियानांतर्गत नागरिकांच्या विविध शासकीय कामांबाबत मार्गदर्शन व सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला हदगाव तालुक्यातील विविध मंडळांमधील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या विविध समस्या व शासकीय कामांसंदर्भात अधिकाऱ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन घेतले.
शासकीय सेवा नागरिकांच्या दारी उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे नागरिकांना कार्यालयीन फेऱ्या कमी होऊन विविध कामांसाठी आवश्यक माहिती व मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळाले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होण्यास मदत झाली असून, अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
बाईट :- गजानन मस्के ( लाभार्थी )
बाईट:- सविता निमडगे( लाभार्थी )
बाईट :- कुबेर राठोड ( लाभार्थी )
