ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोल्यात मोठी कारवाई; घरगुती गॅसच्या अवैध रिफिलिंग अड्ड्यावर छापा, ९.४२ लाखांचा माल जप्त अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ अकोला: घरगुती सिलेंडरमधून ऑटोमध्ये गॅस भरण्याचे रॅकेट सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अकोला यांच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात आली आहे.

0
download

आज दिनांक ०८/१०/२०२६ रोजी श्री. सुदर्शन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने विश्वासनीय माहितीच्या आधारे पो. स्टे. सिव्हील लाईन हद्दीतील दुबेवाडी येथे छापा टाकला.

छाप्यात आरोपी मनोज रमेश दीक्षित (वय ३६, रा. रेल्वे स्टेशन जवळ, अकोला) हा घरगुती वापराचा गॅस पंप मशीनच्या सहाय्याने ऑटोमध्ये अवैधरित्या भरताना आढळला. तर बिस्मिल्ला खान रहेमान खान (वय २९) आणि मोहम्मद आसिफ शेख जुम्मा (वय २७) हे त्यांच्या ऑटोमध्ये घरगुती गॅस अवैधरित्या भरवून घेताना मिळून आले.
या कारवाईत पोलिसांनी:
१) महिंद्रा मालवाहू क्र. MH30 BD 0844
२) ऑटो क्र. MH30 BG 0378
३) ऑटो क्र. MH30 BC 2440
अशा तीन वाहनांसह अंदाजे ८,००,००० रुपये किमतीची वाहने आणि ५८ गॅस सिलेंडर, साहित्य व रोख रक्कम मिळून १,४२,३५० रुपये असा एकूण ९,४२,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम ३, ७ सह कलम २८८ BNS अन्वये पोलीस स्टेशन सिव्हील लाईन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed