ऑपरेशन प्रहार अंतर्गत अवैध शस्त्र बाळगणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा प्रहार; देशी कट्टा व जिवंत काडतुसासह एक आरोपी जेरबंद अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल अकोला: अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि गंभीर गुन्हे करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या इसमांवर अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे
मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरुद्ध
दिनांक ०७ ऑक्टोबर २०२६ रोजी पथक अकोला शहर हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, एक इसम निळ्या रंगाच्या सुझुकी.
मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने तात्काळ जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वाहनतळासमोरील लोखंडी गेटजवळ सापळा रचला. यावेळी आरोपी संतोष नरसिंग ठाकूर (वय २९, रा. म्हातोडी रोड, घुसर, ता. जि. अकोला, ह.मु. १८ नंबर शाळेसमोरील गल्ली, रामदासपेठ मठ, अकोला) याला शिताफीने ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळून:
– १ देशी कट्टा २ मॅगझीनसह (किं. अं. ४०,०००/- रु.)
– ०२ जिवंत काडतुसे (किं. अं. २,०००/- रु.)
– १ निळ्या रंगाची सुझुकी जिक्सर मोटरसायकल क्र. MH 30 BJ 8368
– १ मोबाईल फोन
असा एकूण १,५७,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
