कन्नड “शारदीय नवरात्र निमित्त,जहागिरदार वाड्यात घटस्थापना ” 250 वर्षाची परंपरा कन्नड प्रतिनिधी: रायभान साळवे
कन्नड: शहरात 250 वर्षापासुन जहागिरदार कुटुंब जपतात ही परंपरा शारदीय नवरात्र उत्सवा च्या पहिल्या दिवशी घटस्थापन. आणि देवीचे पुजा,अर्चना करून जहागिरदार परिवाराने सहकुटुंब सह परिवार विधिवत अभिषेक ब्राह्मण तर्फे मंत्रोच्चार पूजन करून नवरात्री चे नऊ दिवस सप्तशती पाठ होमहवन 250 अविरत पणे वर्षापासुन चालू आहे.
माहुरवासीनी रेणुका माता यांची ही सेवा कन्नड च्या जहागिरदार परिवारातील सर्व लहान थोर महिला आणि पुरुष यांच्या तर्फे करण्यात येते.
जहागिरदार घराण्यातील महिला कन्नड येथील ब्राह्मणी नदीकाठी रोज धुणे धुण्यासाठी जात असे, ती महिला ज्या शिळेवर (दगडावर)कपडे धूत असे कालांतराने त्या महिलेच्या स्वप्नात अक्षरशः रेणुका माता यांनी येऊन असे सांगितले की मुली तू ज्या शिळेवर (दगडावर)धुणे धुते त्या दगडातच मी आहे असा साक्षात्कार दिला आणि सांगितले की तू. उद्या सकाळी हा दगड उचलून घरी घेऊन ये. आणि या दगडाची वाजतगाजत विधिवत पूजा अर्चना करून मला घरात माझे ठाणे करून दरवर्षी सर्व परिवाराने एकत्र येऊन मंत्रोच्चारण करून घटस्थापना करावी असा साक्षात्कार देऊन गेल्या. असे केल्यास जहागिरदार परिवारातील प्रत्येक स्त्री पुरुषावर माझा आशीर्वाद राहील, हा सोहळा दरवर्षी न चुकता करावा ,त्यात कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये असे सांगून गेल्या तेव्हा पासून. जहागिरदार परिवाराच्या पिढ्यानपिढ्या कित्येक म्हणजे 250 वर्षापासुन जहागिरदार वाड्यात सहपरीवार येऊन पूजा, करून घटस्थापना करतात.
या मध्ये सर्वात वयोवृद्ध श्रीपाद चिंतामण श्रीकांत ( जहागिरदार) ,दीपक दत्तात्रेय श्रीकांत ( जहागिरदार), सुनील चंपतराव श्रीकांत (जहागिरदार), चिंतामण जनार्दन श्रीकांत (जहागिरदार),मोहन श्रीकांत (जहागिरदार),दिगंबर वसंतराव श्रीकांत (जहागिरदार)जानकीराम श्रीकांत (जहागिरदार) आणि वर्तमान क्रांति चे पत्रकार श्रीहरी श्रीकांत (जहागिरदार)यांनी. या पूजेत सहभाग घेतला .
