वनजमीन अतिक्रमणमुक्त वन विभागाची कारवाई, :- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव वनपरिक्षेत्रातील ग्राम ठाणा येथे,वनविभागाने केलेल्या कारवाईत,दहा हेक्टर वन जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली,या कारवाईत वनविभागाने 13 अतिक्रमण धारकाचे अतिक्रमण काढण्यात आले,
वनजमीन अतिक्रमणमुक्त वन विभागाची कारवाई,
:- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव वनपरिक्षेत्रातील ग्राम ठाणा येथे,वनविभागाने केलेल्या कारवाईत,दहा हेक्टर वन जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली,या कारवाईत वनविभागाने 13 अतिक्रमण धारकाचे अतिक्रमण काढण्यात आले,
वन जमिनीचे संरक्षण, नैसर्गिक वनसंपत्तीचे संवर्धन व जीवनशैली टिकवून ठेवण्याच्या उदेशाने,
ही मोहीम वन विभागाच्या वतीने राबविण्यात आली, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) एस, के, आकले, यांच्या नेतृत्वाखाली,ही मोहीम सकाळी 10 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत कारवाई करण्यात आली,
वनविभागाचे कर्मचारी
आरआरटी पथक, क्षेत्र सहाय्यक वनरक्षक या मोहिमेत सहभाग घेतले,
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार ग्राम ठाणा येथील सुरक्षित वन कक्ष क्रमांक, 478 व 1141( जुना गट क्रमांक 498) तसेच कक्ष क्रमांक 1141 मधील झुडपी जंगलाच्या वनजमिनीवर, गावातील व्यक्तीने अनधिकृतपणे ताबा मिळवले होते
वनजमिनीवर वाफे तयार करून शेतीसह अनेक व्यवसायाकरिता वापर केला जात असे,
वन जमिनीचे मूळ स्वरूप नैसर्गिक संपत्तीच्या संवर्धनाला मोठा नुकसान पोहोचत होत,
संबंधित अतिक्रमणधारकांना अतिक्रमण स्वतःहून हटवा याकरिता वन विभागाच्या वतीने नोटीस बजावण्यात आली होती, मात्र निर्धारित वेळेत अतिक्रमण हटवित नसल्यामुळे, वन विभागाने प्रत्यक्ष अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आले,
या मोहिमेत ठाणा येथील पोलीस पाटील,प्रदीप बावनथळे,तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकुमार भेलावे, डॉ, गोपाल हनवते, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यशवंत बीसेन, सदस्य सुरेश ठाकरे,व ग्रामीण नागरिकांनी सहकार्य केले, बीटचे वनरक्षक, व्ही,पी, परिहार यांनी कारवाई महत्त्वाची भूमिका बजावली
सरोज कावळे ब्युरो हेड गोंदिया
