योगेश्वरी शुगर्सने दराची कोंडी फोडली; पहिली उचल दोन हजार नऊशे रुपये; २५ व्या गळीत हंगामाचा थाटात शुभारंभ परभणी/ प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
येथील योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि., लक्ष्मीनगर, लिंबा, ता. पाथरी जि. परभणी या कारखान्याच्या २५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज सोमवार दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कारखान्याचे डायरेक्टर अभियंते मा. श्री. राहुल आरटी देशमुख यांच्या शुभहस्ते मोळी टाकून या सुवर्ण महोत्सवी हंगामाला सुरुवात करण्यात आली.
जिल्हाभरात ऊसाचा दर जाहीर करा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर संघटना आंदोलन करत असताना योगेश्वरी शुगर्सने दराची कोंडी फोडत या वर्षीच्या उसासाठी एक रकमी २,९०० रुपये पहिली उचल देणार असल्याची घोषणा या साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. रोहित आरटी देशमुख भैय्यासाहेब यांनी यावेळी जाहीर केली. यापूर्वीही या साखर कारखान्याने जाहीर केलेला दर एकरकमी दिला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या घोषणेमुळे उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कारखान्याचे मार्गदर्शक मा. श्री. एच.टी. देशमुख, मा. श्री. एम.टी. नाना देशमुख, मा. श्री. जे.टी. भाऊ देशमुख, डायरेक्टर डॉ. अभिजीत आरटी देशमुख, तसेच कारखान्याचे प्रमोटर सुदामराव सपाटे, लक्ष्मीकांतराव घोडे, गंगाधरराव गायकवाड, इंदरराव कदम हे उपस्थित होते.
कारखान्याचे टेक्निकल डायरेक्टर प्रकाश चांदगुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, डेप्युटी जनरल मॅनेजर राजकुमार तौर, वर्क्स मॅनेजर महादेव भंडारे, चीफ केमिस्ट नवनाथ चौधरी, चीफ अकौंटंट मुकेश रोडगे, मुख्य शेतकी अधिकारी, ऊस विकास अधिकारी कांबळे, लेबर ऑफिसर रामराव कदम, स्टोअर कीपर नंदीप भंडारे, केनयार्ड सुपरवायझर नामदेव वांड्रे, ईडीपी मॅनेजर चैतन्य महाजन, सुरक्षा अधिकारी गणेश वाघमारे, सीनियर क्लार्क सोमेश्वर सिताफे, विष्णुपंत पौळ आदी अधिकारी उपस्थित होते.
तसेच लिंबा गावचे सरपंच विष्णु चव्हाण, चेअरमन लिंबा बाबासाहेब सहजराव, सरपंच आनंद नगर विजय चव्हाण, प्रगतशील शेतकरी बाबासाहेब फले पाटील, नागोराव आरबड, उत्तमराव आरबाड, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, दत्ता धर्मे, किरण घुंबरे, सुशील घुंबरे, सिद्धेश्वर गिरी, भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी, अमोल तौर, दिलीपराव काळे, कमलाकर कोपले, भागवत देशमुख, बिभीषण गीते, मनोज देशमुख, सचिन देशमुख, सुग्रीव कराड, सरपंच कोयाळ राजेभाऊ मुंडे, श्रीराम बडे, सरपंच मोहा पांडुरंग सेप, संदीप देशमुख, दिलीप राव बडे, मोहन देशमुख, कल्याण देशमुख, बबनराव सोळंके, शिवाजी तौर, विनोद देशमुख, उपसरपंच विटा महादेव हारकळ, सुभाष मुंडे, माजी पं.स. सभापती पाथरी तुकाराम जोगदंड, माजी सरपंच लिंबा मुस्ताक शेख, संतोष राणेर, डॉ. कृष्णा राठोड, मंकाजी शिंदे, विक्रम टोम्पे, माजी सरपंच अशोक दुगाने, सरपंच समर्थ नगर शरदराव यादव, माजी सरपंच बाभळगाव उत्तमराव गिराम, चुन्नू भाई, संदिपान हारकळ, वसंतराव लाखे, भारत फुके तसेच मोठ्या प्रमाणात सन्माननीय ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड वाहतूक ठेकेदार व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
