मरते ते शरीर अमर आहे आत्मा, नेत्र दान ने मिळेल परमात्मा “ब्रह्माकुमारी मीरा दीदी” परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
दिनांक – 13 ऑक्टोबर 2026 मंगलवार रोजी शारदीय नवरात्री महोत्सव निमित्त एकता दुर्गा देवी या ठिकाणी ब्रह्माकुमारीज सोनपेठ शाखेच्या वतीने सर्व भाविक भक्तांसाठी *मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरचे आयोजन ब्रह्माकुमारी मीरा दीदी (सोनपेठ सेंटर इन्चार्ज) यांच्या ,जन कल्याणर्थ संकल्पनेतून करण्यात आले असता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्मकुमारी मीरा दीदी यांनी आपले विचार व्यक्त करतेवेळी सांगितले की, मनुष्य जीवनातील शरीरातील अविभाज्य घटक म्हणजे नेत्र त्यासाठी म्हटले जाते *मरते ते शरीर अमर आहे आत्मा नेत्रदानाने मिळेल परमात्मा जसे एखादा दृष्टीहिन व्यक्ती ,दोन्ही डोळ्यांनी जग बघू शकत नाही त्याच प्रकारे अध्यात्मज्ञानाची दृष्टी नसणारा व्यक्ती या जगामध्ये सुंदर पद्धतीने जीवनाकडे पाहू शकत नाही. आत्मा, परमात्मा, सृष्टीचक्र, जन्म मरण, याचे ज्ञान होणे म्हणजे माणसाचा ज्ञानाचा तिसरा डोळा उगवणे होय. *राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम म्हणून राबवला जात असून भालचंद्र आय केअर शंकर शेठ नेत्र रुग्णालय सोलापूर यांच्या सहकार्याने केला जात आहे अशी माहिती मीरा दीदी यांनी दिली.तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित एकदा दुर्गा महोत्सवाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी कुलदीप महाजन ,बाळू महाजन ,मनीष तळवे ,शेखर महाजन ,मीरा दीदी यांनी मेहनत घेतली असून एकता दुर्गा माता मंडळ यांच्या वतीने आयोजक म्हणून कार्यरत असलेल्या आदरणीय राजयोगी ब्रह्माकुमारी मीरा दीदी यांचा शाल श्रीफळ व पुष्प हार घालून सत्कार करण्यात आला. उपस्थित *बांधव व माता भगिनी लहान मुले एकूण सहभागी संख्या टोटल 500 लोकांनी मोफत नेत्र तपासणी शिबिर चा लाभ घेतला मोफत व 16 माता भगिनी मोती बिंदू रुग्ण असल्याचे आढळले ,तसेच नवरात्री उत्सव निमित्त विविध ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येणार असून सोनपेठ शहरातील गणेश नगर नव दुर्गा मंडळ ,जगदंबा मंदिर,सार्वजनिक दुर्गा माता अशा विविध ठिकाणा सह सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव, सायखेडा , खडका ,रेणुका देवी मंदिर डीघोळ अशा विविध ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे
