सात वर्षांची सुवर्णभेटीची परंपरा कायम गोंदियाच्या महाराणीला यंदाही सोन्याचा हार! :- गोंदिया शहरातील ‘गोंदियाची महाराणी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दुर्गामातेच्या चरणी नागपूर येथील एका भाविकाने तब्बल १५ लाख रुपये किमतीचा सुवर्णहार अर्पण केला आहे. मनातील इच्छा पूर्ण झाल्याची भावना व्यक्त करत या भाविकाने शह कुटूंब गोंदियात येऊन देवीला हा सोन्याचा हार समर्पित केला आहे

0
download

विशेष म्हणजे, गेल्या सात वर्षांपासून गोंदियाच्या महाराणीच्या दरबारात दरवर्षी एखादा भाविक सोन्याचा हार अर्पण करत असल्याची परंपरा पाहायला मिळत आहे. देवीवरील भाविकांची अढळ श्रद्धा आणि भक्तिभाव यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. ‘नवसाला पावणारी देवी’ अशी गोंदियाच्या महाराणीची भाविकांमध्ये ओळख आहे. देवीच्या चरणी साकडे घातल्यानंतर मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेतून यंदाही नागपूर येथील एका भाविकाने या वर्षी देवीला १५ लाख रुपये किमतीचा सोन्याचा हार अर्पण केला आहे. गेल्या सात वर्षांपासून गोंदियाच्या महाराणीच्या दरबारात सोन्याचे हार आणि चांदीच्या विविध वस्तू अर्पण करण्याची परंपरा सुरू आहे. यापूर्वीही सहा भाविकांनी कोट्यवधी रुपये किमतीचे सोन्याचे हार देवीला अर्पण केले आहेत.यामध्ये साडेतीन फूट लांबीचा सोन्याचा हार, ११ तोळ्यांचा राणीहार यांसारख्या मौल्यवान दागिन्यांचा समावेश आहे. एका भाविकाने तीन किलो वजनाचे चांदीचे छत्र, तर दुसऱ्या भाविकाने एक किलो वजनाच्या चांदीच्या चरणपादुका आणि चांदीची तीन पूजेची ताटे देवीला अर्पण केली आहेत. विशेष म्हणजे, देवीवरील श्रद्धेपोटी थेट ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथूनही एका भाविकाने गोंदियाच्या महाराणीला मागच्या वर्षी सोन्याची ठुशी अर्पण केला होता तर या वर्षी नागपूरच्या भाविकाने १५ लाख रुपये किमतीचा सुवर्णहार अर्पण केल्याने गोंदियाच्या महाराणीच्या दरबारातील भक्ती आणि श्रद्धेची परंपरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

BYTE -:- नागपूर येथील भाविक

BYTE -:- अशोक इंगळे, गोंदियाच्या महाराणीचे मंडप संयोजक

गोंदियाच्या महाराणीच्या दरबारात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. देवीवरील श्रद्धा, नवसपूर्तीची भावना आणि वर्षानुवर्षे जपली जाणारी अर्पणाची परंपरा यामुळे गोंदियाच्या महाराणीचे धार्मिक महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. एकीकडे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, तर दुसरीकडे मनोकामना पूर्ण झाल्याच्या भावनेतून अर्पण केल्या जाणाऱ्या मौल्यवान भेटवस्तू! नागपूरच्या भाविकाने अर्पण केलेल्या १५ लाख रुपये किमतीच्या सुवर्णहारामुळे गोंदियाच्या महाराणीच्या दरबारातील भक्ती आणि श्रद्धेची परंपरा पुन्हा एकदा समोर आली आहे.तयामुळे गोंदियाच्या महाराणीवरील भाविकांची ही अढळ श्रद्धा नवरात्रोत्सवाचे धार्मिक महत्त्व अधिकच अधोरेखित करत आहे.

सरोज कावळे ब्युरो हेड गोंदिया

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed