निर्णयाची होळी करत सावळी येथे सरकारचा महाराष्ट्र, परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
राज्य सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपये अग्रीम रक्कम जमा करण्याची घोषणा केली आहे. या तुटपुंज्या घोषणेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सावळी येथे १५ ऑक्टोबर रोजी जाहीर निषेध करण्यात आला असून सरकारच्या निर्णयाची होळी करून संताप व्यक्त करण्यात आला. राज्य सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपये अग्रीम रक्कम दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करू या गोष्टीचा स्वाभिमानी शेतकरी संघटना जाहीर निषेध करते. पाच हजार रुपयांमध्ये दिवाळी साजरी केली जाते का ? शेतकऱ्यांना ही मदत नसून शेतकऱ्यांची सरकारने थट्टा केली आहे असा संतप्त सवाल यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला. दुष्काळाची जी बैठक झाली त्या बैठकीवर लाखो रुपयांचा खर्च करून शेतकऱ्यांच्या जखमेवर एक प्रकारे हे सरकार मीठ चोळत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. एका नाष्ट्याचे बिल पाच-पन्नास हजार रुपये होत असेल आणि तुम्ही शेतकऱ्यांना किती मदत दिली? फक्त पाच हजार रुपये राजा उदार झाला आणि हाती धतुरा दिला अशी गत या सरकारची झाली आहे अशा आक्रमक शब्दात कार्यकर्त्यांनी सरकारचा समाचार घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी शासन निर्णयाची प्रत भर रस्त्यात जाळली व सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. या सरकारचा जाहीर निषेध असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. सरकारने अधिकाऱ्यांना गाड्या घेण्यासाठी करोडो रुपये खर्च करायचे आणि शेतकऱ्यांना दिवाळीसाठी केवळ ५ हजार द्यायचे, यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मध्ये पक्ष तालुकाध्यक्ष नामदेव काळे, सतीश काळे, रामा काळे, भरत काळे, दत्तराव काळे, भागवत काळे, अनिल काळे, गणेश काळे, उद्धव काळे, बाळासाहेब काळे यांच्या सह इतर शेतकरी उपस्थित होते.
