इंदिरा गांधी स्टेडियममध्ये खेळाडूंचा एल्गार नगर परिषदेला द्यावे लागले,

0
download

:- गोंदिया शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे स्टेडियममध्ये खेळाडूंना आवश्यक सुविधा मिळत नसल्याची तक्रार आहे, तर दुसरीकडे याच मैदानावर नवरात्रोत्सवानिमित्त गरब्याचा मंडप उभारण्यात आल्याने खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे . क्रीडांगण केवळ खेळाडूंच्या सरावासाठी राखीव ठेवावे, या मागणीसाठी खेळाडूंनी स्टेडियममध्ये आंदोलन करत नगर परिषदेचा निषेध केला. या आंदोलनाची दखल घेत नगराध्यक्ष सचिन शेंडे आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांनी खेळाडूंशी चर्चा करत दिलगिरी व्यक्त केली. यापुढे इंदिरा गांधी स्टेडियम कोणत्याही गैर-क्रीडा कार्यक्रमासाठी दिले जाणार नाही, असे लेखी हमीपत्र नगर परिषदेच्या वतीने खेळाडू संघटनांना देण्यात आले. तसेच स्टेडियममधील खड्डे आणि इतर असुविधा महिनाभरात दूर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर लोकेश यादव यांच्यासह इतर खेळाडूंनी आंदोलन मागे घेतले.

VO -:- इंदिरा गांधी स्टेडियम हे गोंदिया शहरातील खेळाडूंसह पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी सरावाचे महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, गेल्या चार ते पाच वर्षांपासून स्टेडियमची अवस्था दयनीय झाली असून, खेळाडूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्टेडियममधील बास्केटबॉल कोर्टची दुरवस्था, धावण्याच्या ट्रॅकवर पडलेले खड्डे, अपुरी प्रकाशव्यवस्था, पार्किंगचा अभाव, पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे, तसेच नाल्यांमधील अडथळे आणि अस्वच्छता यांसारख्या समस्यांकडे खेळाडूंनी प्रशासनाचे लक्ष वेधले.याशिवाय स्टेडियममध्ये हायमास्ट दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षकांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही खेळाडूंनी केली. मैदानावर विविध कार्यक्रम आयोजित केल्यामुळे खेळाडूंच्या नियमित सरावात अडथळे निर्माण होत असल्याची नाराजीही यावेळी व्यक्त करण्यात आली.

BYTE -:- लोकेश यादव, खेळाडू

:- खेळाडूंच्या आंदोलनाची दखल घेत नगराध्यक्ष सचिन शेंडे आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. खेळाडूंच्या मागण्या ऐकून घेत त्यांनी स्टेडियममधील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.नगर परिषदेच्या वतीने यापुढे स्टेडियम कोणत्याही गैर-क्रीडा कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिले जाणार नाही, असे लेखी हमीपत्र खेळाडू संघटनांना देण्यात आले.

नगर परिषदेच्या लेखी आश्वासनानंतर लोकेश यादव यांच्यासह इतर खेळाडू आणि खेळाडू संघटनांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, आता प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महिनाभरात स्टेडियमची दुरवस्था दूर होणार का? खेळाडूंना सरावासाठी आवश्यक सुविधा मिळणार का? आणि इंदिरा गांधी स्टेडियम केवळ क्रीडा उपक्रमांसाठी राखीव ठेवले जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरोज कावळे ब्युरो हेड, गोंदिया

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed