नांदेड / हदगाव – अतुल राऊतराव धार्मिक उत्सवाचे पावित्र्य जपा; उत्सवाच्या नावाखाली सुरू असलेले विडंबन थांबवा – समाजप्रबोधनकार संग्रामबापू भंडारे महाराज
हदगाव शहरातील महात्मा बसवेश्वर चौक येथे अष्टभुजा दुर्गा महोत्सवाच्या वतीने समाजप्रबोधनकार श्री संग्रामबापू भंडारे महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धार्मिक उत्सवांचे पावित्र्य जपण्याबरोबरच समाजातील अनिष्ट प्रवृत्ती दूर करण्याचे आवाहन भंडारे महाराजांनी आपल्या कीर्तनातून केले.
नवरात्रोत्सव हा शक्तीच्या उपासनेबरोबरच भक्ती, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा उत्सव आहे. मात्र, सध्या धार्मिक उत्सवांच्या नावाखाली सुरू असलेले विडंबन कुठेतरी थांबले पाहिजे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत केवळ उत्सव साजरा न करता भक्तीचा जागर करावा, समाजात चांगले विचार रुजवावेत आणि समाजबांधवांनी संघटित होऊन सामाजिक एकोपा वाढवावा, असे आवाहन समाजप्रबोधनकार संग्रामबापू भंडारे महाराज यांनी केले.
युवकांनी चुकीच्या प्रवृत्तींपासून दूर राहून शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेला प्राधान्य द्यावे. उत्सवात केवळ उत्साह दाखवण्यापेक्षा समाजासाठी विधायक कार्य करून आपली ऊर्जा योग्य दिशेने वापरावी, असा संदेशही त्यांच्या कीर्तनातून देण्यात आला.
अष्टभुजा दुर्गा महोत्सवाच्या वतीने आयोजित या कीर्तनातून धार्मिक श्रद्धेबरोबरच सामाजिक एकता, संस्कार आणि युवकांच्या जबाबदारीवर विशेष भर देण्यात आला.
बाईट : श्री संग्रामबापू भंडारे महाराज – समाजप्रबोधनकार
