अमरावतीत मोठी कारवाई! नागपुरी गेट पोलिसांनी 3.93 लाखांचा MD जप्त केला, दोन तस्कर अटकेत अमरावती – नागपुरी गेट पोलिसांची मोठी कारवाई, 20.62 ग्रॅम MD ड्रक्स सह दोघांना अटक
अमरावती: शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
दिनांक 15/10/2026 रोजी डी.बी. पथक प्रमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश नांदे हे पथकासह पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, अंसार नगर येथील दोन युवक काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटरसायकलवर MD ड्रग्ज विक्रीसाठी ॲकॅडमीक ग्राउंड परिसरात फिरत आहेत.
या माहितीच्या आधारे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. शासकीय पंच, फोटोग्राफर आणि फॉरेन्सिक टीम अमरावती यांना बोलावून ॲकॅडमीक ग्राउंड येथे दबा धरला असता, दोन संशयित इसम स्प्लेंडरवर येताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
अटक आरोपी:
1) फैजान खान अनिस खान, वय 25
2) शहबाज खान इस्माईल खान, वय 25 (दोघे रा. अंसार नगर, वाहेद मजीद जवळ, अमरावती)
त्यांच्याकडून 20.62 ग्रॅम MD ड्रक्स(किंमत 3,93,000 रु.), गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल, 2 मोबाईल आणि 700 रु. रोख असा एकूण 4,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फॉरेन्सिक टीमने प्राथमिक तपासणीत तो MD ड्रक्स असल्याचा अहवाल दिला आहे.
चौकशीत दोघांनी सांगितले की, हा माल फरार आरोपी अब्दुल काशिफ अब्दुल कलीम रा. धरमकाटा याच्या सांगण्यावरून विक्रीसाठी आणला होता.
याप्रकरणी नागपुरी गेट पोलीस स्टेशन येथे अपराध. क्र. 546/2026 कलम 8(क), 21(ब), 29 NDPS Act अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, सहा. पोलीस आयुक्त निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कोटनाके, पोलीस उपनिरीक्षक विकास मनपिया आणि डी.बी. पथकातील मलिक अहेमद, दिनेश नांदे, संदीप देशमुख, दानिश शेख, राहुल रोडे, सागर पंडित, विक्रम नशिबकर, कुणाल बरडे, आसिफ शेख, सुधीर गुळधे, आकाश कांबळे यांनी केली.कारवाहि केली पुढिल तपास नागपुरी गेट अमरावती पोलीस करीत आहे,
जिल्हा प्रतिनिधी -कैलास वाकपांजर
