विषारी हरभरे खाल्ल्याने सहा गाढव मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती

0
download

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावंडगाव येथील घटना रहिमापूर पोलीस स्टेशन व अंजनगाव ठाण्यात तक्रार दाखल

 

 

 

 

अडगाव खाडे येथील गाढव मालक रमेश सुरजुसे वय ६५ वर्ष यांचे मालकी चे १० गाढव होते. ते रहिमापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गावंडगाव येथे काम करण्याकरिता आठ दिवसांपासून मुक्कामी होते. तेथे चार मजुर सुद्धा मुक्कामी राहत होते. दि. १६ ऑक्टोंबर रोजी सकाळी पाच वाजताच्या दरम्यान एक गाढव खाली पडुन मृत्युमुखी पडले. कामगार यांनी गाढव मालकांना सदर घटनेची माहिती दिली. असता एक एक तासाने चार गाढव मरण पावले आजारी असलेले सहा गाढव औषध उपचार करण्यासाठी आपल्या गावी अडगाव येथे आनले औषध उपचार करण्यात आला.गावडगाव घटनास्थळी विषारी हरभरे आढळून आल्याने संशय व्यक्त झाला.विषारी हरभरे खाल्ल्याने मरण पावले प्राथमिकता दिसून आलेची घटनास्थळी गावकऱ्यांमध्ये चर्चा होती.आपल्या राहत्या घरी आनलेले सहा गाढव पैकी दोन गाढव आणखी दगावले तर चार गाढवचे उपचार सुरू आहे. रहीमापुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याकरिता रमेश सुरजुसे गेले असता ठाणेदार प्रशांत देशमुख यांनी प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेता तात्काळ asi प्रभाकर चव्हाण व शिपाई अजिनाथ खाडे यांना घटनास्थळ पंचनामा व पीएम करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा व पशु वैद्यकीय अधिकारी यांना संपर्क साधुन चार गाढवांचे गावडगाव येथे पीएम करण्यात आले.तर दोन गाढवांचे अडगाव येथे पीएम केले.पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए.बी.बचे, डॉ. रंनदीवे सहायक आयुक्त अंजनगाव सुर्जी, डॉ. प्रशांत सुरजुसे कापूसतळणी, डॉ. आदेश चोपडे धनेगाव , डॉ सोपान ठाकरे श्री हाडोळे ,अक्षय तायडे, पर्यवेक्षक जुनघरे, पंचनामे वेळी हजर होते. एक गाढव सतरा ते अठरा हजार रुपये असल्याचे सांगितले तर एकुण सहा गाढवाची एक लाख आठ हजार रुपये अंधाजी किंमत असल्याचे बोलल्या जात आहे. मुके जनावर यांना मारण्यासाठी अज्ञान व्यक्तीने विषारी हरभरे टाकले म्हणून प्राथमिक माहिती ने तेथील गावकरी यांच्या समोर गाढव मरण पावल्याणे हळहळ व्यक्त केली. पीएम रिपोर्ट आणल्यानंतर नेमके गाढव कशाणे मरण पावले हे सत्य जो पर्यंत समोर येत नाही तो पर्यंत गाढव मालकासह पंचक्रोशीत नागरिक सत्य घटनेची वाट पाहत आहेत. जिल्हा प्रतिनिधी -कैलास वाकपांजर

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed