मनुष्य जीवनात दुसऱ्या साठी वेळेवर उपयोगी पडतो तो, खरे जीवन जगतो * * ब्रह्माकुमारी मीरा दीदी * परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
शारदीय नवरात्री महोत्सव निमित्त रेणुका देवी मंदिर डीघोळ या ठिकाणी ब्रह्माकुमारीज सोनपेठ शाखेच्या वतीने सर्व भाविक भक्तांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरचे आयोजन ब्रह्माकुमारी मीरा दीदी (सोनपेठ सेंटर इन्चार्ज) यांच्या ,जन कल्याणर्थ संकल्पनेतून करण्यात आले असता, कार्यक्रमाच्या आयोजक व मुख्य मार्गदर्शिका म्हणून ब्रह्मकुमारी मीरा दीदी यांनी आपले विचार व्यक्त करतेवेळी सांगितले की, जो जगासाठी जगतो तो जिवंत व जो स्वतः साठी जगतो तो मृत, मनुष्य जीवन हे अमूल्य जीवन आहे , माणसाच्या शरीरातील अविभाज्य घटक म्हणजे नेत्र त्यासाठी म्हटले जाते नेत्र नाही तर जत्रा नाही.
मरते ते शरीर अमर आहे आत्मा नेत्रदानाने मिळेल परमात्मा जसे एखादा दृष्टीहिन व्यक्ती ,दोन्ही डोळ्यांनी जग बघू शकत नाही त्याच प्रकारे अध्यात्मज्ञानाची दृष्टी नसणारा व्यक्ती या जगामध्ये सुंदर पद्धतीने जीवनाकडे पाहू शकत नाही. आत्मा, परमात्मा, सृष्टीचक्र, जन्म मरण, याचे ज्ञान होणे म्हणजे माणसाचा ज्ञानाचा तिसरा डोळा उगवणे होय. देहा कडून देवा कडे जाताना मधे माझा देश लागतो आणि मी त्या देशाचे देणं लागतो हा विचार कायम जीवनात कार्य स्वरूपाने भावी जीवनातही आठवणीत राहणार आहे याची खात्री आहे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम म्हणून राबवला जात असून भालचंद्र आय केअर शंकर शेठ नेत्र रुग्णालय सोलापूर यांच्या सहकार्याने केला जात आहे अशी माहिती मीरा दीदी यांनी दिली.तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित रेणुका देवी मंदिर समिती सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मीरा दीदी विनोद पारेकर ,नागेश भैया, नेत्र तपासणी साठी सहयोगी गणेश ,विशाल, गणेश घोलप , मीरा दीदी यांनी मेहनत घेतली असून आयोजक व मुख्य मार्गदर्शिका म्हणून कार्यरत असलेल्या आदरणीय राजयोगी ब्रह्माकुमारी मीरा दीदी यांचा रेणुका देवी मंदिर बजरंग पुजारी यांच्या शुभहस्ते मीरा दीदी यांचा शाल श्रीफळ व पुष्प हार घालून सत्कार करण्यात आला*. उपस्थित बांधव व माता, भगिनी एकूण सहभागी संख्या टोटल 300 लोकांनी मोफत नेत्र तपासणी शिबिर चा लाभ घेतला मोफत व 15 माता भगिनी मोती बिंदू रुग्ण असल्याचे आढळले ,तसेच नवरात्री उत्सव निमित्त विविध ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येणार असून सोनपेठ शहरातील व ग्रामीण भागातील विविध ठिकाणी नवरात्री उत्सव निमित्त आयोजित करण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.जन सेवा हेच माझे जीवन असून मी सोनपेठ शहर व तालुक्यातील अनेक ठिकाणी समाज हिताचे कार्य गेली 21 वर्षे पासून करत आहे अशी माहिती मीरा दीदी यांनी सूत्राशी बोलताना दिली*
