कन्नड ” दुष्काळ, नापिकी आणि बेरोजगारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या ” कन्नड प्रतिनिधी: रायभान साळवे

0
download

तालुक्यातील मोजे जवळी या गावी बेरोजगार तरुण किरण सुभाष गायकवाड या 28 वर्षा च्या युवकाने घरातच पडलेले विषारी औषध पिऊन आपली जीवन यात्रा संपविली.
मयत किरण याचा लहान भाऊ यांनी सांगितले की घरात अठरा विश्व दारिद्रय़ त्यात आई दहा वर्षापूर्वी देवा घरी गेली, वडिलांनीच आमचे पालनपोषण करून आमच्या पायावर उभे केले. मी सुद्धा ट्रॅक्टर वर कामाला जातो, जे काम भेटेल ते करून मी आपला आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतो. वडील हॉटेलात कामाला जातात, आमच्या कडे फक्त दीड एकर जमीन आहे त्यात हा असा दुष्काळ.
पेरणी साठी व्याजाने पैसे काढले पेरणी केली पण पाऊस पडला नाही या चिंतेने तो परेशान होता, पण घरात काही सांगत नव्हता,काल दिनांक 14 रोजी तो घरी आला तेव्हा त्याच्या काय डोक्यात आले कोणास ठाऊक शेतात पडलेले फवारणी करण्याचे औषध शोधून 7 ते साडेसात च्या दरम्यान प्राशन केले त्याला उलट्या होत असल्याने तात्काळ कन्नड च्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले पण कन्नड येथील डॉक्टरांनी त्याला छ.संभाजीनगर येथे पाठवले, छ.संभाजीनगर येथे जाता जाता त्याची प्राणज्योत वेरूळ येथे मालवली.
त्याला लगेच वेरूळ च्या रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तेथे पोस्ट मार्टम न करता त्याला जवळी या गावी आणण्यात आले ही बातमी लिही पर्यत अंत्यसंस्कार करण्यात आला नव्हता. अशी माहिती मिळते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed