कन्नड “कन्नड वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी नारायण टोमपे ACB च्या जाळ्यात ” पाच हजाराची लाच घेताना चतुर्भुज कन्नड प्रतिनिधी: रायभान साळवे

0
download

कन्नड तहसीलच्या आवारातून 5 हजाराची लाच स्वीकारताना केली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली अटक .
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की लाकूड व्यवसाय करणार्‍या 54 वर्षीय तक्रारदारा ला लाकडांची भरलेली गाडी हद्दपार करून देण्यासाठी कन्नड वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी.आरोपी लोकसेवक शिवाजी नागनाथ टोमपे यांनी मासिक हफ्ता 7000 हजार रुपयांची मागणी केली होती मात्र लाकूड व्यावसायिक लाच देण्यास तयार नव्हता .
लाकडाचा व्यावसाय करणाऱ्याला लाच द्यायची नसल्यामुळे त्याने छ.संभाजीनगर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडे तक्रार दिली.
दिनांक 14 रोजी लाच मागणी पडताळणी दरम्यान लाकूड व्यवसाय करणाऱ्या आणि.आरोपी लोकसेवक शिवाजी टोमपे यांच्या मध्ये लाकूड वाहतूक करणार्‍या गाडी हद्दपार करण्यासाठी व त्या गाडीवर कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्यासाठी 7000 हजार एवजी 5000 हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली. असे तपासात निष्पन्न झाले.
त्या नुसार आज दिनांक 16 रोजी कन्नड तहसीलच्या आवारात तक्रार दारा कढून 5000 हजार रूपयांची लाच स्वीकारताना सापळा लावून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी. शिवाजी टोमपे याने 5000 हजार रुपये. पंचा समोर स्विकारली असता त्याला रंगेहात पकडण्यात आले .
पुढील कारवाई कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या. पोलीस अधीक्षक माधुरी केदार ( कांगने),पोलीस अधीक्षक शशिकांत शिनगारे, यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल सोनवणे, प्रतिभा अबूझ, प्रशांत पवार, पोलीस हवालदार अशोक नागरगोजे, सचिन बोरसे, यांचे पथक सामील झाले होते.

लाकडाच्या वाहतुकी च्या गाडीला कोणीही आमच्या गाडीला रोखू नये यासाठी मासिक हफ्ता

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed