डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे बहुजन समाज सत्तेत -राजेश गित्ते*

0
3428564.png

बीड –
आज दिनांक 27/04/2026 रोजी मौजे बेलंबा तालुका परळी वैजनाथ येथे विश्र्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण आणि बोद्ध विहारातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन भाजपा तालुका अध्यक्ष राजेश गित्ते यांच्या हस्ते करण्यात आले.

आपले मनोगत व्यक्त करताना राजेश गित्ते यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे दिन, दलित, दुबळे यांच्या जीवनात अमूल्य सकारात्मक बदल झाले.आज बहुजन समाज जो सतेत दिसत आहे तो फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच आहे.

या कार्यक्रमास बेलंबा गावच्या सरपंच महानंदाताई सरवदे, बेलंबा सेवा सोसायटीचे चेअरमन संजय गित्ते, बेलंबा गावचे उपसरपंच किशोर गित्ते,
दशरथ (भाऊ) गित्ते, सीताराम गित्ते (गुरुजी),
शालेय समिती अध्यक्ष केशव गित्ते,
यासह आदी सर्व भीम अनुयायी आणि गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

भीम जयंती उत्सव समिती बेलंबाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत उपाध्यक्ष मंगेश तायडे आणि सर्व पदाधिकारी यांनी सुंदर नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला.q

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed